भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 


कोणासाठी सेफ्फशू  आवश्यक आहे.

मधुमेह आहे त्यांना:

मधुमेह

ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे असे. जसे घराण्यात मधुमेह आहे. वजन जास्त आहे. किंवा कामात ताणतणाव जास्त आहे अश्याना सेफ्फशू  वापरणे फायदेशीर आहे. सेफ्फशू  मुळे चालणे अधिक आरामदायी आणि जलद होते. त्यामुळे मधुमेह होणे टाळणे किंवा पुढे ढकलणे शक्य होते. अयोग्य फुटवेअर मुळे चालण्याचा उत्साह मावळतो, त्यामुळे मधुमेह दूर ठेवण्यासाठी आवश्यक असे चालणे टाळावेसे वाटते. त्यामुळे ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते त्यांना तो लवकर होऊ शकतो. .

मधुमेह असलेल्यांचे "आधी पाय तपासा" बहुतेक वेळा, मधुमेहाचे शरीरावरील परिणाम आधी पायांवर दिसू लागतात. मधुमेहातील अनेक प्रकारच्या मज्जातन्तुंचा ह्रास आधी पायांमध्ये दिसू लागतो. यामुळे थंड गरम याच्या संवेदना कमी होणे. पायांना येणार घाम कमी होणे वगेरे लक्षणे दिसू शकतात. स्नायुंवरील नियंत्रण राक्त्वाहीन्यांवरील नियंत्रण कमी झाल्याने पायांचा आकार, चालण्याचा धन्गही बदलतो. या सर्व गोष्टींमुळे पायाला जखमा होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते कारण अश्या अवस्थेतील व्यक्ती पायात कुठेतरी दुखते आहे हे न कळल्याने तशीच चालत राहते.

मधुमेह असलेल्या व्यक्तींमधील अश्या जुनाट जखमांच्या उपचारासाठी एका हार्ट अटॅक च्या उपचारांपेक्षा जास्त खर्च येवू शकतो. मधुमेह असलेल्या १५ ते २५ टक्के लोकांना कधीतरी या प्रसंगाला सामोरे जावे लागते. सेफ्फशू  फुटवेअर नियमित व सतत वापरल्याने हा धोका बऱ्यापैकी कमी होतो. चालण्याचा त्रास कमी होतो तो ते वेगळे.

मधुमेहातील पायांच्या जखमा

औषधयोजना आणि शस्त्रक्रिया कितीही चांगली झाली असली तरीही मधुमेह असताना पायांच्या जखमा बऱ्या होण्यास बराच वेळ लागतो. कारण पायाच्या जखमेवरील भागावर अतिरिक्त दाब पडतो. संवेदनाहीन बधीर पायावर जखमेवर दाब पडल्याने ती दुखत असते तरी कळत नाही. त्यामुळे अश्या जखमेवर दाब देत व्यक्ती चालत राहते. हे टाळण्यासाठी त्याने सर्व वेळ झोपून राहिले पाहिजे किंवा जेणेकरून चालताना जखमेवर दाब पडणार नाही असे फुटवेअर घातले पाहिजे. झोपून राहिल्यास रक्तातील साखर आणि वजनही आटोक्यात ठेवणे कठीण जाते. कामधंद्यावरही परिणाम होतो. अश्यावेळी जखमेवर दाब न पडता चालता येण्यासाठीही सेफ्फशू  फुटवेअर उपयोगी पडते.

मधुमेह नसलेल्या लोकांसाठी

संधिवातामुळे वेडेवाकडे झालेले पाय

संधीवाताच्या काही प्रकारात सांधे वेडेवाकडे होवून चालणे अती वेदनादायक होते. अश्यांसाठी सेफ्फशू  संधीवातासाठीचे फुटवेअर वेदना बऱ्याच प्रमाणात कमी करते.

गुडघेदुखी

मांड्या, गुडघे, पोटरीचा भाग, घोटे आणि पाऊल हे एकाच अक्षावर सम्यकात असतात. अनेक कारणांनी हा सम्यक बिघडतो. अश्या परिस्थितीत होणारी गुडघेदुखी सेफ्फशू  सुधारक फुटवेअर मुळे सम्यक साधल्याने बऱ्याच प्रमाणात कमी होते. वा चालही सुधारते.

भोवऱ्या आणि घट्टे

पायांना होणाऱ्या भोवऱ्या आणि घट्टे अती वेदनादायक असतात. मधुमेही पायांच्या बाबतीत घट्टे म्हणजे अर्धी आणीबाणीच. या ठिकाणी दाब बराच जास्ती असल्याने त्वचा फाटून व्रण होण्याचा धोका असतो. सेफ्फशू  बचावात्मक फुटवेअर हा दाब कमी करण्याचे उपाय योजून वेदनांपासून सुटका देतात व व्रण होण्याचा धोकाही कमी करतात.

फ्लॅट फुट

काही पाय जन्मतः फ्लॅट फुट प्रकारात मोडतात तर काही पाय पायाची कमान कमी झाल्याने अथवा कलल्याने फ्लॅट फुट सारखे होतात. सेफ्फशू  सुधारक फुटवेअर मुळे अश्या कमानींना आधार मिळून, अनुषंगिक त्रासही कमी होतो.

चालताना त्रास होणे किंवा पाय दुखणे

काही जणांना चालयाला त्रास होतो, पाय दुखतात.अश्याना सेफ्फशू  सुधारक फुटवेअर/आरामदायक फुटवेअर दिलासा ठरते.

टाचदुखी (Heel Spur/Calcaneal Spur)

टाचेत एक गुलाबाच्या काट्यासारखा काटा तयार होतो. सकाळी जमिनीवर पाय ठेवला कि तो रुततो आणि डोक्यापर्यंत कळ जाते. हळुहळू ती कमी होते पण काही दिवसानंतर सतत दुखत राहते. सेफ्फशू  सुधारक फुटवेअर मुळे बहुतेकांना ताबडतोप आराम पडतो.

पायाचे इतर त्रास/अयोग्य चाल

समुद्रकाठच्या ओल्या वाळूत किंवा सदा शिंपडलेल्या अंगणात अनवाणी चालणे हा एक आनंददायी अनुभव असतो. सेफ्फशू  फुटवेअर ह्याच अनुभवाची आठवण करून देते. अनेक कारणांनी बाजारातील तयार फुटवेअर हा अनुभव देवू शकत नाही.

संकीर्ण

बाजारातील तयार फुटवेअर पायांच्या मापाशी जुलातेच असे नाही. एखादा पाय लहान असतो तर एखादे पाऊल रुंद असते. बहुतेक वेळी दोन्ही पाय फुटवेअर पेक्षा रुंद असतात. खूप कष्ट करूनही जोरात चालता येत नाही. या आणि अश्या अनेक प्रश्न सेफ्फशू  फुटवेअर मुळे सुटू शकतात.

आपणास आणखीन काही त्रास असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा
© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर