भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 


शंकासमाधान

सेफ्फशू   कोणी वापरावेत?

सेफ्फशू प्रत्येकाच्या मापाप्रमाणे सेफ्फशू बनविले जाते. त्यामुळे ते सर्वसाधारण वापरासाठीही उपयुक्त आहे. यामध्ये पायाखाली जरा जाडसर गादी असते, जी पायावर येणारा जास्तीचा दाब बऱ्याच प्रमाणात कमी करते. यामुळे सेफ्फशू अधिक आरामदायक असते. या कारणाने ते कोणीही वापरू शकते. दुखऱ्या पायांना आधार देण्यासाठी लागणारे वेगवेगळे आधारही यांच्या आताच दडलेले असतात. यामुळे ज्यांना चालण्याचे किंवा पायांचे काही त्रास असतात त्यांना बराच आराम मिळू शकतो. पायाच्या त्रासांची काही उदाहरणे. रुंद पाय, दुखरे पाय, टाचदुखी, चालताना त्रास होणे दुखणे, थोडेफार दोष जसे कि एखादा पाय किंवा पाऊल थोडे लहान असणे, मधुमेह किंवा मधुमेही पाय असणे, संधीवात, गुडघेदुखी वगेरे. असे त्रास असलेल्या मंडळींनी हे सतत वापरणे चांगले.

सेफ्फ्शू   म्हणजे काय ?

सेफ्फ्शू   म्हणजे "Scientifically Engineered Form Feature Shoe." अर्थात "शास्त्रीय तंत्रज्ञानाने आकारमानाप्रमाणे बनलेले शू" ही एक वेगळीच आमची खास प्रणाली आहे. डी. एस.एल मानकाप्रमाणे सेफ्फ्शू  बनवले जाते. या बहुस्तरीय बहुअंकीय प्रणाली प्रमाणे पायाचे मापदंड ठरवले जातात. हा अंक ठरविण्यासाठी चालण्याचे चलचीत्रण केले जाते. तळपायायाचे दबलेल्या अवस्थेत छायाचित्र काढले जाते. प्रमाणित पद्धतीने पायांची मापे घेतली जातात. या वा इतर पद्धतीनी पायाचा विशिष्ठ अंक तयार झाला कि त्या प्रमाणे पादत्राणे बनविली जातात.

सेफ्फ्शूजच   का?

सेफ्फ्शू   प्रणाली भारतीय पायांसाठी सुयोग्य आहे. भारतीयांच्या पायांमध्ये अनेक आकारांचे आणि रुंद /अरुंद पाय आढळतात. ही प्रणाली या सगळ्या पायांना सामावून घेवू शकते. अगदी १२ इंच लांब पायांसाठी सुद्धा हे बनवता येते. सेफ्फ्शू   चालण्यासाठी आरामदायी असते. त्याची रचना आणि उत्पादन पद्धती ही कारागिरीचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. पायाच्या व चालण्याच्या दोषांमध्ये सुधार करण्यासाठी लागणाररया बहुतेक दुरुस्त्या त्याच्या आतच दडवलेल्या असतात. पुढील भाग टणक बनविलेला असतो आणि त्यात बोटांच्या पुढे जराशी मोकळी जागा असते त्यामुळे ठेच लागल्यास बोटे वाचू शकतात. बोटांचा भाग मोकळा असल्याने बोटे चीम्बून जात नाहीत तर बुटाच्या आताही ती मोकळे पणाने हलविता येतात. अर्थातच सहज चालीसाठी त्यामुळे कोणताही अडथळा येत नाही. सेफ्फ्शू   बनवण्यासाठी उत्कृष्ठ दर्जाचेच साहित्य वापरले जाते. त्यामुळे पादत्राणे चावण्याची शक्यता कमी होते व थोडी काळजी घेत ते सर्व ऋतूत वापरताही येते. तालाच्या भागाची जमिनीवरील पकड जास्त असल्यामुळे शेवाळे, गुळगुळीत फरश्या, तसेच बर्फाळ प्रदेशातही ठामपणे चालता येते. या सगळ्या सुविधांच्या परिणामी, चालणे सहज, वेगवान, रुबाबदार, आरामदायी आणि आनंददाई होते. मधुमेह असलेल्या मंडळीसाठी सेफ्फ्शू   सुधारक पादत्राणे फक्त पायांना जखमा होऊ नयेत किंवा झाल्यास बऱ्या व्हाव्यात या साठीच वापरले जात नाही. तर इतर मंडळीनाही चालण्यात सुधारणा होण्यासाठी ते नियमित वापरता येणारे व इतर पादत्राणांसारखेच दिसणारे असे आहे. योग्यवेळी सेफ्फ्शू   वापरायला सुरवात केल्यास मुधुमेहातील अनेकविध मज्जातंतूंचा ह्रास झाल्याने होणाऱ्या त्रासातून बचावाची संधी तर मिळतेच पण चालणे हा एक आल्हाददायी अनुभव होऊ शकतो. बहुतेक वेळा चालण्यात झालेला हा बदल सेफ्फ्शू   घातल्याबरोबर जाणवायला लागतो.

सेफ्फ्शू   लॅब मध्ये जाण्याची गरज का आहे?

सेफ्फ्शू   लॅबमध्ये डी.एस.एल. अंकासाठी लागणारी पायाची सगळी माहिती जमा करणारी आधुनिक यंत्रणा असते. ही सर्व माहिती सेफ्फ्शूच्या  मुंबई केंद्रामध्ये पोहोचवली जाते. तेथे सेफ्फ्शूचे  तज्ञ त्याची चिकीत्सा करून डी.एस.एल अंक तयार करतात. मग इतरही काही प्रक्रिया झाल्यावर सेफ्फ्शूच्या  च्या कारखान्यात आपली पादत्राणे तयार होतात. ती मानकांबरहुकुम आहेत, हे तपासल्यानंतर ती लॅब मध्ये पाठवली जातात आणि ग्राहकांना दिली जातात.

आपणास आणखी काही शंका असल्यास आमच्याशी संपर्क साधावा.

© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर