भोज्जा शंकासमाधान उत्पादने संपर्क कार्यसंधी आमच्या बद्दल क्षणचित्रे संग्राह्य उतारे
DSL सेफ्फशू डायबेटिक फूटवेअर
 
सेफ्फशू म्हणजे काय

मला कशासाठी सेफ्फशू
कोणासाठी सेफ्फशू
ज्यांना असतो:
• मधुमेह (Diabetes)
• मधुमेही पायांच्या जखमा
• संधीवात
• गुडघेदुखी
• भोवऱ्या आणि घट्टे
• फ्लॅट फुट
• चालण्याचे त्रास
• हिल स्पर किंवा टाचदुखी
• इतर पायांचे त्रास

कोठे मिळेल सेफ्फशू फुटवेअर?

सेफ्फशू लॅब बद्दल माहिती
 


सेफ्फशू  लॅबॉरेटरी

सेफ्फशू  लॅबॉरेटरी ह्या चालण्याची पद्धत आणि पायांचा अभ्यास करणारया प्रयोगशाळा आहेत.

सेफ्फशू  लॅबॉरेटरी ह्या आमच्या प्रतीनिधींद्वारे चालवण्यात येणाऱ्या प्रयोगशाळा आहेत. येथे पायांचा व चालीचा अभ्यास करण्यासाठी लागणारी सामग्री असते तसेच प्रशिक्षित व्यक्ती असतात. त्यांच्या सहाय्याने पायात व्यवस्थित बसणारे आणि योग्य प्रकारचे फुटवेअर मिळू शकते. येथे पायांची माहिती घेण्यात येते, चालण्याचे चलतचित्रण करण्यात येते, तळपायांचे उभ्या अवस्थेतही चित्रण करण्यात येते, आणि डी..एस.एल.प्रणाली प्रमाणे पायांचे मापन करण्यात येते. गरजे प्रमाणे पायांच्या संवेदान्क्षामातही मोजता येते. किंवा पायांच्या तळव्यावर पडणारा दाब वा तापमानातील फरकही मोजता येतो. ही सर्व माहिती आमच्या मुंबईतील मुख्य केंद्रात पोहोचवली जाते. मुख्य केंद्रात त्यावर प्रक्रिया करून त्याचे विश्लेषण केले जाते. या नंतर पायांनुसार योग्य तो पदवेश तयार करून पाठविला जातो. सेफ्फशू  लॅबॉरेटरी मध्ये तो व्यवस्थित बसतो आहे हे पाहून दिला जातो.

चलतचित्रण (Videography)

अनवाणी पायांनी समुद्रकिनाऱ्यावरील ओल्यावाळूवर किंवा सदा शिंपडलेल्या ओल्या अंगणात चालणे हा एक सुखद अनुभव असतो. सेफ्फशू  लॅबॉरेटरी मध्ये असाच अनुभव देणारा पण कोरडा पट्टा चालण्यासाठी तयार असतो. या पट्टयावर चालताना, चालण्याचे जलद चलतचीत्रण केले जाते. या पट्टयावर नैसर्गिक पणे चालता येते. या पट्टयासाठी वापरलेलेच सामान, फुटवेअरमध्ये पायाखाली वापरले जाते. हे चलतचित्रण मुंबईतील केंद्रात तज्ञांकडून तपासले जाते व चालीतील दोषांसाठी सुधारणा केल्या जातात.

तळपायांचे चित्रण (Plantar Photography)

काही क्षेत्रातील मंडळीना जास्त काळ उभे राहावे लागते. चालताना आणि उभे राहताना तळपायांवर पडणाऱ्या दाबाचे प्रकार वेगळे असतात. त्याच्या विश्लेषणासाठी तळपायांचे चित्रण सेफ्फशू  लॅबॉरेटरी मध्ये केले जाते.

पायांची मापे

डी.एस.एल. अंक हा पायांची मापे घेण्याच्या प्रमाणित पद्धतीवर आधारित आहे. मापे घेण्याच्या साधनांच्या जाडीमुळेही फुटवेअर नीट न बसण्याची शक्यता असते. या अनोख्या पद्धतीमुळे पायातील काही दोषही उघड होतात.

पायांची तपासणी व इतिहास

पायांवर कुठे घट्टे पडले आहेत का? कुठे भोवरी झाली आहेका? रंगात कुठे बदल आहेत का याची नोंद घेतली जाते व तश्या खुणा केल्या जातात. तसेच पायांच्या संवेदना, नखांची स्थिती/रंग, चालण्याचे व उभे राहण्याच्या सवयी आदींची नोंद घेतली जाते.

समुपदेशन

या सर्व गोष्टींच्या आधारे कुठल्या प्रकारचे पादत्राण केंव्हा आणि कसे वापरावे व पायांची काळजी कशी घ्यावी यावर डायबेटिक फुट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सूत्रांनुसार समुपदेशन केले जाते.

सेफ्फशू  लॅबॉरेटरी मधील वितरण

अश्या रीतीने तयार झालेले फुटवेअर सेफ्फशू  लॅबॉरेटरी मध्ये पायात नीट बसतेय हे बघून वितरित केले जाते. विशेष करून वेड्यावाकड्या व जखमा असलेल्या पायांसाठी हे आवश्यक असते.

अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करा

© सेफ्फशू डायबेटिक फुटवेअर